गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६४ :
खटल्यापासून अबाधित ठेवण्याचे अधिकार :
१) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचा किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचा किंवा आदेशाचा भंग करण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे किंवा त्याच्यामध्ये सहभागी असल्याचे दिसून येणाऱ्या कोणत्याही साक्ष मिळविण्यसाठी तिला खटल्यापासून अबाधित ठेवणे आवश्यक किंवा इष्ट आहे, असे केंद्र सरकारचे किंवा राज्य शासनाचे मत असल्यास (असे मत होण्याची कारणे लेखी नमूद करण्यात येतील) ते अशा व्यक्तीला ती व्यक्ती अशा भंगाच्या संबंधातील संपूर्ण परिस्थितीचे खरे कथन करील या शर्तीवर या अधिनियमाखालील किंवा भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) किंवा इतर कोणत्याही केंद्रीय अधिनियमाखालील किंवा राज्य अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाबद्दलच्या खटल्यामधून अबाधित होऊ शकेल.
२) संबंधित व्यक्तीला देऊ केलेली सूट व तिने स्वीकारलेली सूट याबाबतीत त्या सूटीची व्याप्ती जितपत असेल तितपत ज्या अपराध्याच्या बाबतीत सूट देण्यात आली असेल त्या अपराधाच्या कोणत्याही खटल्यातून अबाधित ठेवण्यात येईल.
३) केंद्र शासनाला किंवा यथास्थिती राज्य शासनाला असे आढळून येईल की, खटल्यापासून अबाधित ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने तिला ज्या अटींवर अशी सूट देण्यात आली होती त्या अटींचे पालन केलेले नाही किंवा ती जाणीवपूर्वक काहीतरी लपवीत आहे किंवा खोटा पुरावा देत आहे, तर केंद्र सरकार किंवा यथास्थिती राज्य सरकार तशा आशयाचे निष्कर्ष नमूद करील आणि त्यानंतर अशी सूट मागे घेण्यात आल्याचे मानण्यात येईल आणि अशा व्यक्तीची तिला ज्याबाबतीत सूट देण्यात आली असेल अशा अपराध्यांच्या संबंधात किंवा त्याच बाबीशी संबंधित असा ज्या अन्य कोणत्याही अपराधाच्या बाबतीत तो दोषी असेल त्या संबंधात न्यायचौकशी करता येईल.
