Ndps act कलम ६४-अ : १.(उपचारांसाठी स्वत:हून येणाऱ्या व्यक्तींना खटल्यापासून अबाधित ठेवणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६४-अ :
१.(उपचारांसाठी स्वत:हून येणाऱ्या व्यक्तींना खटल्यापासून अबाधित ठेवणे :
कलम २७ किंवा अल्पमात्रा गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अपराधाचा ज्याच्यावर दोषारोप करण्यात आलेला नसेल अशी कोणतीही व्यसनी व्यक्ती किंवा व्यसनमुक्त होण्यासाठी सरकारकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा मान्यता देण्यात आलेल्या रूग्णालयातून किंवा स्थानिक रूग्णालयातून किंवा संस्थेतून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी स्वेच्छेने आली असेल आणि असे उपचार घेत असेल, तर ती तिच्या हयातील कलम २७ अन्वये खटला भरला जाण्यास पात्र असणार नाही.
परंतु, अशा व्यसनी व्यक्तीने किंवा व्यसनमुक्त होण्याबाबतचे उपचार पूर्ण करून घेतले नाहीत, तर तिला देण्यात खटल्यापासूनची सूट मागे घेण्यात येईल.)
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमाकं ९ याच्या कलम ३० अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply