Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ४ : गुंगीकारक औषधी द्रव्ये इत्यादींच्या दुरूपयोगास आणि बेकायदेशीर व्यवहारास प्रतिबंध आणि विरोध करण्यासाठकी केंद्र सरकारने उपाय योजना करणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
प्रकरण २ :
प्राधिकरणे आणि अधिकारी :
कलम ४
गुंगीकारक औषधी द्रव्ये इत्यादींच्या दुरूपयोगास आणि बेकायदेशीर व्यवहारास प्रतिबंध आणि विरोध करण्यासाठकी केंद्र सरकारने उपाय योजना करणे :
१) केंद्र सरकार गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांच्या दुरूपयोगास आणि बेकायदेशीर व्यवहारास प्रतिबंध करण्यासाठी त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटतील असे उपाय या अधिनियमाच्या तरतुदींच्या अधीन राहून करील.
२) विशेषत: आणि पोटकलम (१) च्या तरतुदींच्या व्यापकतेला बाधा न पोचता केंद्र सरकारला त्या पोटकलमानुसार योजता येतील अशा उपायांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीच्या संबंधातील उपयांचा समावेश राहील.
अ) विविध अधिकारी, राज्य सरकारे आणि इतर प्राधिकरणे यांच्या,
१) या अधिनियमाखालील, किंवा
२) या अधिनियमाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीच्या बाबत त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याखालील कृतींमध्ये समन्वय साधणे.
ब) आंतरराष्ट्रीय कराराखालील बंधने.
क) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांर परिणाम करणारे पदार्थ यांच्या बेकायदेशीर व्यवहारास प्रतिबंध करण्यासाठी आणि ते संपुष्टात आणण्यासाठी त्या कामात समन्वय साधता यावा व सार्वत्रिक कारवाई करता यावी म्हणून परदेशातील संबंधित प्राधिकरणांना आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनांना मदत करणे.
ड) व्यवसनाधीन व्यक्ती शोधून काढणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांना शिक्षण देणे, व्यसनमुक्त झाल्यानंतर त्यांची देखभाल करणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना पुन्हा समजाचा एक घटक बनवणे.
१.(डअ) वैद्यकीय आणि वैज्ञानिक वापरासाठी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थांची उपलब्धता.)
ई) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी परिणामकारक रीतीने होण्याकरिता आणि गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ व त्यांचा बेकायदेशरी व्यवहार यांना प्रतिबंध आणि विरोध करण्यासाठी केंद्र सरकारला आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा इतर बाबी.
३) केंद्र सरकारला या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता आवश्यक किंवा इष्ट वाटल्यास ते शासकीय राजपत्रात एक आदेश प्रसिद्ध करून त्याद्वारे त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील असे केंद्र सरकारचे या अधिनियमाखालील अधिकार केंद्र सरकारचे या अधिनियमाखालील अधिकार बजावण्यासाठी आणि कामे पार पाडण्यासाठी व पोटकलम (२) मध्ये उल्लेख केलेल्या बाबींपैकी आदेशात नमूद करण्यात येतील अशा बाबींच्या संबंधात उपाययोजना करण्यासाठी त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा नावाचे प्राधिकरणाला किंवा अशा नावांची प्राधिकरणांची अधिकार श्रेणी स्थापन करू शकेल आणि अशा प्राधिकरणाला किंवा प्राधिकरणांना त्या आदेशात नमूद केलेले अधिकार बजावण्याचा उपाययोजना करण्याचा प्राधिकार जणू काही या अधिनियमान्वये देण्यात आलेला असावा. अशा प्रकारे अशा प्राधिकरणाला किंवा प्राधिकरणांना केंद्र सरकारची देखरेख व नियंत्रण यांच्या आणि अशा आदेशाच्या तरतुदींच्या अधीन राहून ते अधिकार बजावता येतील व ते उपाय योजना येतील.
——–
१. २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version