गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४८ :
बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आलेले पीक जप्त करण्याचे अधिकार :
कोणताही महानगर दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबतीत विशेषरीत्या अधिकार प्रदान केलेला (इतर कोणताही दंडाधिकारी) किवा कलम ४२ खाली अधिकारी देण्यात आलेला कोणताही राजपत्रित अधिकारी याला कोणत्याही अफूच्या झाडांची, कॅनॅबिस वनस्पतीची किंवा कोका वनस्पतीची लागवड बेकायदेशीरपणे करण्यात आली आहे, असे सकारण वाटल्यास, त्याला अशा वनस्पतीच्या जप्तीचे आदेश देता येतील आणि असे करतानाच त्याला योग्य वाटतील असे (पीन नष्ट करण्याच्या आदेशासह) अन्य आदेशही काढता येतील.
