गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४५ :
सरकारजमा करण्यायोग्य वस्तू जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीतली कार्यपद्धती :
या अधिनियमान्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेला कोणताही माळ (उभ्या पिकासह) जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीत कलम ४२ अन्वये योग्य रीतीने प्राधिकार प्रदान करण्यात आलेला कोणताही अधिकारी, अशा माळाच्या मालकावर किंवा तो ताब्यात असणाऱ्या व्यक्तीवर तिने आपल्या परवानगीशिवाय तो माळ हलवू नये, तो दुसऱ्याला देऊ नये किंवा त्यासंबंधात कार्यवाही करू नये, असा आदेश बजावू शकेल.
