Ndps act कलम ४४ : कोका वनस्पती, अफुची झाडे व कॅनॅबिस वनस्पती यांच्या संबंधातील अपराधाच्या बाबत प्रवेश, झडती, जप्ती व अटक करण्याचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४४ :
कोका वनस्पती, अफुची झाडे व कॅनॅबिस वनस्पती यांच्या संबंधातील अपराधाच्या बाबत प्रवेश, झडती, जप्ती व अटक करण्याचे अधिकार :
कलम ४१, ४२ व ४३ यांच्या तरतुदी शक्य असेल तितपत, प्रकरण चारखालील शिक्षायोग्य अपराधांच्या बाबतीत आणि कोका वनस्पती, अफूची झाडे व कॅनॅबिस वनस्पती यांच्या संबंधातील अपराधांना लागू होतील आणि या प्रयोजनासाठी त्या कलमातील गुंगीकारक औषधी द्रव्यांचा किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा १.(किंवा नियंत्रीत पदार्थाचा) उल्लेख हा कोका वनस्पती, अफूची झाडे व कॅनॅबिस वनस्पती यांचाही उल्लेख आहे, असा त्यांचा अर्थ लावण्यात येईल.
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम २० अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply