Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ३६ : १.(विशेष न्यायालयांची स्थापना :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३६ :
१.(विशेष न्यायालयांची स्थापना :
१) या अधिनियमाखालील अपराधांची न्यायचौकशी वेगात व्हावी यासाठी तरतूद करण्यासाठी शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा क्षेत्रांसाठी आवश्यक असतील तितकी विशेष न्यायालये स्थापन करता येतील.
२) विशेष न्यायालयामध्ये एकच न्यायाधीश असेल व त्याची नेमणूक शासनाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सहमतीने केली पाहिजे.
स्पष्टीकरण :
या पोट कलमामध्ये उच्च न्यायालय म्हणजे विशेष न्यायालयाचा सत्र न्यायाधीश किंवा अपर सत्र न्यायाधीश त्याची असा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याच्या लगतपूर्वी येथे काम करीत असेल अशा राज्याचे उच्च न्यायालय.
३) एखाद्या व्यक्तीची विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात येण्याच्या लगतपूर्वी जर ती सत्र न्यायाधीश किंवा अपरसत्र न्यायाधीश नसल्यास अशी व्यक्ती विशेष न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाण्यासाठी पात्र असणार नाही. )
——–
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ११ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version