गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३६-ब :
अपील व पूनरीक्षण :
जितपत शक्य असेल तितपत, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, (१९७४ चा २) याच्या प्रकरण एकोणतीस व तीस अन्वये न्यायालयाकडे सोपवण्यात आलेले अधिकार हे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादांमधील एखादे विशेष न्यायालय हे जणू काही उच्च न्यायालयाच्या स्थानिक सीमांमधील प्रकरणांची न्यायचौकशी करणारे सत्र न्यायालय असावे त्याप्रमाणे उच्च न्यायालयाकडून वापरण्यात येतील.
