गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३५ :
सदोष मानसिक अवस्था गृहित धरणे :
१) ज्यासाठी आरोपीची मनाची सदोष स्थिती असणे आवश्यक असते अशा या अधिनियमाखालील एखाद्या अपराधासंबंधीच्या कोणत्याही खटल्यात न्यायालयाने मनाची अशी स्थिती असल्याचे गृहित धरले पाहिजे. परंतू त्या खटल्यातील अपराधात आरोप करण्यात आलेल्या कृतीच्या बाबतीत आपली अशी मानसिक अवस्था नव्हती, हे सिद्ध करण्याचा बचाव आरोपीला असेल.
स्पष्टीकरण :
या कलमात सदोष मानसिक अवस्था या संज्ञेत उद्देश, हेतू कृतीचे ज्ञान आणि वस्तुस्थितीबाबत विश्वास किंवा असा विश्वास ठेवण्यास कारण या गोष्टींचा समावेश होतो.
२) या कलमाच्या प्रयोजनासाठी एखादी वस्तुस्थिती, ती अस्तित्वात असण्याची शक्यता अधिक असल्याचे केवळ सिद्ध केल्यामुळे सिद्ध होत नाही, तर तो संशयातीतपणे असल्याबद्दल न्यायालयाचा विश्वास असला पाहिजे.
