गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३२अ :
या अधिनियमान्वये दिलेल्या कोणतीही शिक्षा निलंबित, माफ किंवा सौम्य करण्यात येणार नाही :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) किंवा त्या वेळी अमलात असलेला इतर कोणताही कायदा यात काहीही अंतर्भूत असले तरी, परंतु कलम ३३ च्या तरतुदींस अधीन राहून या अधिनियमान्वये दिलेली कोणतीही शिक्षा (कलम २७ वगळून) निलंबित, रद्द किंवा सौम्य करण्यात येणार नाही.
