Ndps act कलम ३० : तयारी :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३० :
तयारी :
कोणतीही व्यक्ती, कलम १९, २४ व २७ अ आणि गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम पदार्थाच्या व्यापारी मात्रा संबंधीचे आणि त्या त्या घटनेशी संबंधीत अशा कोणत्याही शिक्षा पात्र ठरेल असा अपराध ठरणारी कोणतीही गोष्ट करील किंवा करण्याचे वगळील आणि प्रकरणाच्या परिस्थितीवरून असा वाजवी निष्कर्ष काढता येईल की, अपराध करण्याचा आपला उद्देश पार पाडण्याचा निर्धार होता. तथापि, तिच्या इच्छेपलीकडील कोणत्याही परिस्थितीमुळे तिला तसा करण्यास प्रतिबंध झाल्यास ती व्यक्ती तिने असा अपराध केला असता तर तिला जी किमान शिक्षा (असल्यास) झाली असती त्याच्या निम्म्यापेक्षा कमी नाही पण जी अशा अपराधासाठी असलेल्या कमाल शिक्षेच्या निम्म्या शिक्षेइतक्या मुदतीपर्यंत वाढविता येईल अशा सश्रम कैदेच्या शिक्षेस आणि तसेच उपरोक्त परिस्थितीत तिला जो किमान दंड झाला असता (असल्यास) त्याच्या निम्म्या रकमेपेक्षा कमी नाही, परंतु तिला सर्वसाधारणत: (म्हणजेच विशेष कारणांच्या अभावी) ज्या जास्तीत जास्त रकमेच्या दंडाची शिक्षा झाली असती त्याच्या निम्म्या रकमेपर्यंत वाढविता येईल इतक्या दंडाचीही शिक्षा होण्यास ती पात्र ठरेल.
अ) अल्प मात्राच्या उल्लघंनाकरिता, सहा महिन्यापर्यंत सक्त मजूरीच्या कैदैस किंवा दहा हजार रूपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांकरिता पात्र ठरेल.
ब) व्यापारी मात्रा पेक्षा कमी परंतू अल्पमात्रा जास्त मात्राच्या उल्लंघनाकरिता दहा वर्षापर्यंतच्या सक्त मजूरीच्या कैदेस आणि एक लाख रूपये पर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
क) व्यापारी मात्राच्या उल्लंघनाकरिता, दहा वर्षापेक्षा कमी असणार नाही परंतु विस वर्षापर्यांतच्या सक्त मजुरीच्या कैदेस आणि एक लाख रूपयाहून कमी नसेल इतक्या परंतु रूपये दोन लाख पर्यंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या दंडासही पात्र ठरेल.
तथापी न्यायालयाला न्यायनिर्णयात कारण नमूद करून दंडाची रक्कम दोन लाख रूपयांपेक्षाही वाढविता येईल.

Leave a Reply