Ndps act कलम २९ : अपप्रेरणा आणि दंडनीय कट यासाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २९ :
अपप्रेरणा आणि दंडनीय कट यासाठी शिक्षा :
जो कोणी या प्रकरणान्वये शिक्षा योग्य असेल अशा अपराधासाठी अपप्रेरणा देईल किंवा असा अपराध करण्यासाठी दंडनीय कटात सहभागी असेल, तो, मग असा अपराध अशा अपप्रेरणेमुळे किंवा अशा दंडनीय कटाच्या अनुरोधाने घडलेला असो अथवा नसो आणि भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम ११६ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, अशा अपराधासाठी तरतूद करण्यात आलेली शिक्षा होण्यास पात्र ठरेल.
२) एखादी व्यक्ती या कलमचाया अर्थानुसार अपराध असेल अशा गोष्टीसाठी अपप्रेरणा देते किंवा त्यासाठी दंडनीय कटात सहभागी असले म्हणजे भारताखेरीज किंवा भारताबाहेरील एखाद्या ठिकाणी अशी एखादी कृती करण्यासाठी अपप्रेरणा देते किंवा त्यासाठीच्या एखाद्या दंडनीय कटात सहभागी असते जी कृती –
अ) एखादी व्यक्ती या कलमाच्या अर्थानुसार अपराध असेल अशा गोष्टीसाठी अपप्रेरणा देते किंवा त्यासाठीच्या एखाद्या दंडनीय कटात सहभागी असते जी कृती-
अ) भारतात केली असती तर अपराध ठरली असती; किंवा
ब) अशा ठिकाणाच्या कायद्यानुसार गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांच्याशी संबंधित असा अपराध ठरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर शर्ती पुऱ्या करणारी जर भारतात केली असती तर या प्रकरणान्वये शिक्षायोग्य असेल असा अपराध ठरण्यासाठी आवश्यक अशा किंवा त्यासारख्या कायदेशीर शर्तींचा समावेश असणारी ठरली असती.

Leave a Reply