गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २६ :
अनुज्ञप्तीधारकाने किंवा त्याच्या नोकराने विशिष्ट कृती केल्याबद्दल शिक्षा :
या अधिनियमान्वये किंवा त्याअन्वये काढलेल्या कोणत्याही नियमान्वये किंवा आदेशान्वये देण्यात आलेल्या कोणत्याही अनुज्ञप्तीचा, परवान्याचा किंवा प्राधिकारपत्राचा धारक किंवा त्याच्या नोकरीत असलेली आणि त्याच्या वतीने कृती करणारी कोणतीही व्यक्ती –
अ) या अधिनियमाच्या तरतुदींनुसार किंवा त्याअन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमान्वये ठेवणे आवश्यक असलेले कोणतेही लेखे ठेवण्याचे किंवा सादर करणे आवश्यक असलेली विवरणष सादर करण्याचे कोणत्याही वाजवी कारणाशिवाय वगळील;
ब) अशा अनुज्ञप्तीची, परवान्याची किंवा प्राधिकारपत्राची, त्याबाबतीत केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारेन अधिकार प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागणी केली असता, वाजवी कारणाशिवाय ते सादर करण्यात कसूर करील,
क) चुकीचे किंवा जे अचूक नाहीत हे माहीत असताना किंवा तसे मानण्यास कारण असताना असे हिशेब ठेवील किंवा अशी विवरणे तयार करील; किंवा
ड) या अधिनियमात अन्यत्र ज्यासाठी शिक्षा विहित करण्यात आलेली नाही अशा अनुज्ञप्ती, परवाना किंवा प्राधिकारपत्राच्या कोणत्याही शर्तीचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही कृती स्वेच्छापूर्वक आणि जाणीवपूर्वक केल्यास, ती तीन वर्षांपर्यंत वाढविता येईल अशा मुदतीच्या कैदेच्या शिक्षेस किंवा दंडास किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.
