Ndps act कलम २५अ : कलम ९ अ अन्वये काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २५अ :
कलम ९ अ अन्वये काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
कोणीही कलम ९ अ अन्वये काढलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्यास ती दहा वर्षापर्यंत वाढविता येईल अशा मुदतीच्या सक्तमजुरीसह कैदेस आणि एक लाख रूपयापर्यंत वाढविता येईल, अशा दंडास पात्र ठरेल.
परंतु न्यायालयास न्यायनिर्णयात कारण नमूद करून एक लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा दंडही लादता येईल.

Leave a Reply