Mv act 1988 कलम ७० : टप्पा वाहन परवान्यासाठी करावयाचा अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७० :
टप्पा वाहन परवान्यासाठी करावयाचा अर्ज :
१) टप्पा वाहनाच्या संबंधातील किंवा राखील टप्पा वाहन म्हणून परवाना (या प्रकरणात यापुढे त्याचा उल्लेख टप्पा वाहन परवाना असा केला आहे) मिळण्यासाठी करावयाच्या अर्जामध्ये शक्यतोवर पुढील तपशील समाविष्य करण्यात येईल-
(a)क) अ) अर्ज ज्याच्याशी संबंधित असेल तो एक किंवा अनेक मार्ग किंवा ते क्षेत्र किंवा ती क्षेत्रे;
(b)ख) ब) अशा प्रत्येक वाहनाचा प्रकार व आसनक्षमता;
(c)ग) क) दररोज जितक्या फेऱ्या करण्याचे योजिले असेल, त्या फेऱ्यांची किमान व कमाल संख्या;
स्पष्टीकरण – हे कलम, कलम ७२, कलम ८० आणि कलम १०२ यांच्या प्रयोजनार्थ फेरी याचा अर्थ, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत एकेरी प्रवास असा आहे आणि परतीचा प्रत्येक प्रवास ही वेगळी फेरी असल्याचे मानण्यात येईल.
(d)घ) ड) ही सेवा चालती ठेवण्यासाठी व विशेष प्रसंगी उपलब्ध करून देण्यासाठी जितकी वाहने राखीव ठेवण्याचा विचार असेल त्या वाहनांची संख्या;
(e)ड) ई) वाहने ठेवण्याच्या जागेची सोय, त्यांची देखभाल व दुरूस्ती यांसाठी आणि उतारूंना आराम लाभावा व त्यांची सोय व्हावी यासाठी आणि सामान साठवण्याची सोय व त्यांची साय व्हावी यासाठी आणि समान साठवण्याची सोय व त्याचा सुरक्षित सांभाळ यासाठी कोणती व्यवस्था करण्यात येणार आहे.
(f)च) फ) विहित करण्यात येतील अशा इतर बाबी.
२) पोटकलम (१) मध्ये उल्लेख केलेल्या अर्जासोबत, विहित करण्यात येतील असे दस्तऐवज सादर करण्यात येतील.

Leave a Reply