मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५९ :
मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार :
१) केंद्र सरकार, सार्वजनिक सुरक्षा, सोय व या अधिनियमाचे उद्दिष्टे विचारात घेऊन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, मोटार वाहनाच्या निर्मितीच्या तारखेपासून त्याचे आयुर्मान निश्चित करील व अशा तारखेच्या समाप्तीनंतर ते मोटार वाहन, या अधिनियमातील व त्याखाली केलेल्या नियमातील आवश्यकता पूर्ण करील असल्याचे मानण्यात येणार नाही.
परंतु, केंद्र सरकार, मोटार वाहनांच्या निरनिराळ्या वर्गांसाठी किंवा निरनिराळ्या प्रकारांसाठी वेगवेगळे आयुर्मान विनिर्दिष्ट करू शकेल.
२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, केंद्र सरकार, कोणत्याही प्रदर्शनामध्ये प्रात्याक्षिकासाठी प्रदर्शित करणे किंवा वापर करणे, तांत्रिक संशोधनाच्या प्रयोजनासाठी वापर करणे किंवा qव्रटेज मोटार शर्यतीत सहभागी होणे, यांसारख्या मोटार वाहनाच्या वापराच्या प्रयोजनांचा विचार करून, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अशा अधिसूचनेत विनिर्दिष्ट करता येतील, अशा शर्तींच्या अधीनतेने, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कोणत्याही वर्गाच्या किंवा प्रकारच्या मोटार वाहनास अधिसूचनेमध्ये नमूद करावयाच्या प्रयोजनासाठी पोट-कलम (१) च्या कार्यान्वयानातून सूट देऊ शकेल.
३) कलम ५६ मध्ये काहीही अंतर्भूत असले, तरीदेखील कोणतेही विहित प्राधिकरण किंवा प्राधिकृत चाचणी केंद्र, पोट-कलम (१) खाली काढलेल्या कोणत्याही अधिसूचनेतील तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहनास योग्यता प्रमाणपत्र देणार नाही.
१.(४) केन्द्र शासन, सार्वजनिक सुरक्षा, सुविधा, पर्यावरणाचे संरक्षण आणि या अधिनियमाचे उद्देश यांचा विचार करुन मोटार वाहन व त्यांच्या भांगाचे आयुष्य पूर्ण झाले आहे, त्यांचे आयुष्य वाढेल यासाठी त्यांच्या प्रक्रिया करुन आयुष्य वाढविण्यासाठी पद्धत विहित करण्यासाठी नियम बनवू शकेल.)
————
१. २०१९ का अधिनियम सं. ३२ की धारा २४ द्वारा उपधारा ३ के पश्चात अंत:स्थापित ।