JJ act 2012 कलम ८१ : कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री आणि खरेदी :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८१ :
कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री आणि खरेदी :
कोणीतीही व्यक्ती कोणत्याही उद्देशाने बालकाची खरेदी किंवा विक्री केल्यास सदर व्यक्तीस पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या अवधिच्या कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाचीही शिक्षा होईल.
परंतु असे की, जर असा अपराध ज्या व्यक्तीकडे बालकाचा प्रत्यक्ष ताबा आहे, अशा व्यक्तीने, रुग्णालय, प्रसूतीगृह किंवा शुश्रुषागृहात नोकरी करणारी व्यक्ती असल्यास शिक्षेचा कारावासाचा कालावधी तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल.

Leave a Reply