माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
१.(पहिली अनुसूची) :
(कलम १ चे पोटकलम ४ पहा )
ज्या दस्तऐवजांना किंवा व्यवहारांना हा अधिनियम लागू असणार नाही ते दस्तऐवज व व्यवहार :
अनुक्रमांक —- दस्तऐवजांचे किंवा व्यवहारांचे वर्णन
१ — परक्राम्य संलेख अधिनियम (निगोशिएबल इंन्स्टूमेंट अधिनियम) १८८१ (१८८१ चा २६) याच्या कलम १३ मध्ये व्याख्या केलेला परक्राम्य संलेख (धनादेशाव्यतिरिक्त).
२ — मुखत्यारपत्र अधिनियम १८८२ (१८८२ चा ७) (पॉवर ऑफ अॅटॉर्नी) याच्या कलम १-क मध्ये व्याख्या केलेले मुखत्यारपत्र.
३ — भारतीय विश्वस्त अधिनियम १८८२ (१८८२ चा ९) (इंडियन ट्रस्ट अधिनियम) याच्या कलम ३ मध्ये व्याख्या कलेले विश्वस्त मंडळ.
४ — भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (१९२५ चा ३९) (इंडियन सक्सेशन अधिनियम) याच्या कलम २ च्या खंड (ज(एच)) मध्ये व्याख्या केलेले मृत्यूपत्र तसेच कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारी अन्य कोणतीही मृत्युपत्रीय व्यवस्था.
५ — स्थावर मालमत्तेच्या विक्रीचा किंवा अभिहस्तांकनाचा कोणताही करार किंवा अशा मालमत्तेवरील कोणताही हितसंबंध.
——-
१. सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४९ द्वारे सुधारणा.