माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
१.(दुसरी अनुसूची) :
(कलम ३-क चे पोटकलम १ पहा )
इलेक्ट्रॉनिक सही किंवा इलेक्ट्रॉनिक प्रमाणीकरण तंत्र आणि प्रक्रिया :
——-
अ.क्र. (१) : (१)
वर्णन (२) : आधार ई-केवायसी सेवा वापरून ई-प्रमाणीकरण तंत्र
प्रक्रिया (३) : इलेक्ट्रॉनिक रेकॉडचे प्रमाणीकरण ई-प्रमाणीकरण तंत्राद्वारे खालील प्रमाणे केले जाईल –
क) प्रमाणित प्राधिकरणाद्वारे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी, ई-ऑथेटिकेशन, हॅश आणि असममित क्रिप्टो सिस्टम तंत्राचा उपयोग लागू होईल.
ख) एखाद्या विश्वसनीय तृतीय पक्ष सेवा द्वारे की जोडी जनरेशन, २.(***) की जोड्या संग्रहित करणे आणि डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध होईल आणि प्रमाणकर्ता प्राधिकरणाद्वारे विश्वसनीय तृतीय पक्षकार प्रस्तावित होईल. विश्वसनीय तृतीय पक्ष ग्राहकाला डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी प्रमाणित प्राधिकरणाकडे अर्ज आणि प्रमाणपत्र स्वाक्षरी विनंती पाठवेल.
ग) प्रमाणित प्राधिकरणाद्वारे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जारी करणे हे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र अर्जदार ई-प्रमाणीकरण, माहिती तंत्रज्ञान (प्रमाणित प्राधिकरण) नियम, २००० च्या अनुसूची ४ च्या फॉर्म (ग) मध्ये निर्दिष्ट तपशील, आधार ई-केवायसी सेवांमधून डिजिटल स्वाक्षरी केलेली सत्यापित माहिती आणि इलेक्टड्ढॉनिक संमतीवर आधारित असेल.
घ) ई-प्रमाणीकरणाची पद्धत आणि आवश्यकता नियंत्रकाने वेळोवेळी जारी केल्यानुसार असतील.
ङ) सदस्य की जोडी तयार करण्याची सुरक्षा प्रक्रिया नियंत्रकाने जारी केलेल्या ई-ऑथेंटिकेशन मार्गदर्शक तत्वांनुसार असेल.
च) माहिती तंत्रज्ञान (प्रमाणीकरण प्राधिकरण) नियम, २००० च्या नियम ६ मध्ये संदर्भित मानकांचे पालन केले जाईल, जेथ पर्यंत डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र अर्जदाराच्या सार्वजनिक की च्या प्रमाणन कार्याशी संबंधित आहेत.
३.(ज्या पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीद्वारे माहितीचे प्रमाणीकरण केले जाते, डिजिटल स्वाक्षरी (एंड एंटिटी) नियम २०१५ च्या नियम ३ ते १२ मध्ये निर्दिष्ट केलेल्या, जो पर्यंत निर्मिती, संचयन आणि डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी चा संबंध असेल, पद्धती व मानकांचे पालन करेल.))
———
१. अधिसूचना क्र. जी एस आर ६१ (ई) २७-०१-२०१५ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
२. अधिसूचना क्र. जी एस आर ५३९ (ई) ३०-०६-२०१५ द्वारा हार्डवेयर सिक्योरिटी मॉड्यूल (एच एस एम) हे शब्द वगळण्यात आले.
३. अधिसूचना क्र. जी एस आर ४४६(ई) २७-०४-२०१६ द्वारा मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
——-
तीसरी अनुसूची :
सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ५० द्वारे गाळली.
चौथी अनुसूची :
सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ५० द्वारे गाळली.