माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ९ :
दस्तऐवज फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यात आले पाहिजेत असा आग्रह धरण्याचा अधिकार कलमे ६, ७ व ८ देत नाहीत :
कलमे ६, ७ व ८ मध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला, केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही मंत्रालयाने किंवा विभागाने किंवा कोणत्याही कायद्याद्वारे स्थापन केलेल्या किंवा केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे नियंत्रण असलेल्या किंवा त्याच्याकडून निधी देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्राधिकरणाने किंवा मंडळाने कोणतेही दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपात स्वीकारले, दिले, निर्माण केले, ठेवले किंवा जतन केले पाहिजेत किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक नमुन्यात केले पाहिजेत असा आग्रह धरण्याचा अधिकार देत नाही.