माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ८७ :
केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :
१) केंद्र सरकार, या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून नियम तयार करील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेला बाध न आणता अशा नियमात, पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करण्यात येईल.
(a)१.(क)(अ) कलम ३-क च्या पोटकलम (२) खालील इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची विश्वसनीयता किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची विश्वसनीयता किंवा इलेक्ट्रॉनिक अधिप्रमाणन तंत्र विचारात घेण्याच्या शर्ती;
(aa)कक)(अअ) कलम ३-क च्या पोटकलम (३) खालील इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची किंवा अधिप्रमाणनाची खात्री करण्याची कार्यपद्धती;
(ab)कख) (अब)ज्या रीतीने कोणतीही माहिती किंवा बाब कलम ५ अन्वये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या सहाय्याने अधिप्रमाणित करता येईल ती रीत;)
(b)ख)(ब) कलम ६, पोटकलम – १) अन्वये फाईल करणे, काढणे, देणे किंवा प्रदान करणे या गोष्टी ज्यामध्ये अमलात आणल्या जातील तो इलेक्ट्रॉनिक फॉम;
(c)ग)(क) कलम ६, पोटकलम (२) अन्वये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड फाईल करण्याची किंवा देण्याची रीत आणि नमुना आणि प्रदान करण्याची पद्धत;
(ca)२.(गक)(कअ) ज्या रीतीने अधिकृत सेवा पुरवठाकार, कलम ६-क च्या पोटकलम (ग) अन्वये सेवा आकार गोळा करून शकेल, तो ठेवून घेऊ शकेल व त्याचा वापर करू शकेल ती रीत.)
(d)घ)(ड) कलम १० अन्वये ज्यामध्ये डिजिटल सिग्नेचर करता येईल असा ३.(डिजिटल सिग्नेचरचा) टाईप, रीत आणि नमुना याच्याशी संबंधित बाबी;
(e)४.(ङ)(इ)कलम १५ अन्वये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर निर्माण करणारा डाटा ज्या रीतीने साठविण्यात येईल व लावण्यात येईल ती रीत.
(ea)ङक)(इअ)कलम १६ खालील सुरक्षाविषयक प्रक्रिया पद्धती;)
(f)च)(फ) कलम १७ खालील नियंकि, उपनियंत्रक ५.(सहायक नियंत्रक, इतर अधिकारी व कर्मचारी) यांच्या अर्हता, अनुभव आणि सेवेच्या अटी व शर्ती,
(g)६.(छ)(ग)(***)
(h)ज)(ह) कलम २१ च्या पोटकलम (२) अन्वये अर्जदाराने पूर्ण करावयाच्या आवश्यकता;
(i)झ)(आय) कलम २१, पोटकलम (३) च्या खंड (क) अन्वये दिलेल्या लायसेन्सचा वैधता कालावधी;
(j)ञ)(जे) कलम २२, पोटकलम (१) अन्वये लायसेन्ससाठीचा अर्ज ज्या नमुन्यात करता येईल तो नमुना;
(k)ट)(के) कलम २२, पोटकलम (२) च्या खंड (ग) अन्वये देय असलेली फी ची रक्कम;
(l)ठ)(एल) कलम २२, पोटकलम (२) च्या खंड (घ) खालील लायसेन्ससाठीच्या अर्जासोबत असेल पाहिजेत असे इतर दस्तऐवज;
(m)ड)(एम) कलम २३ खालील लायसेन्सच्या नवीकरणासाठीचा नमुना आणि त्यासोबत भरावयाची फी;
(ma)७.(डक)(एमअ) कलम ३५ अन्वये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्र देण्याच्या अर्जाचा नमुना व शुल्क.)
(n)ढ) कलम ३५, पोटकलम (१) अन्वये ज्यामध्ये ३.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल असा अर्जाचा नमुना.
(o)ण) कलम ३५, पोटकलम २ अन्वये ३.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्यासाठी प्रमाणन प्राधिकरणाला द्यावयाची फी;
(oa)णक)कलम ४० अन्वये वर्गणीदारांची कर्तव्ये
(ob)णख) कलम ४३-क खालील वाजवी सुरक्षाविषयक पद्धती व प्रक्रिया आणि संवेदनक्षम वैयक्तिक डाटा किंवा माहिती;
(p)त) कलम ४६, पोटकलम (१) अन्वये अभिनिर्णय करणारा अधिकारी ज्या रीतीने चौकशी करील ती रीत;
(q)थ) कलम ४६, पोटकलम (३) अनुसार अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने धारण करावयाच्या अर्हता व अनुभव;
(r)(s)(t)८.(***)
(u)प) कलम ५७, पोटकलम (३) अनुसार ज्या नमुन्यात अपील दाखल करता येईल तो नमुना आणि त्यासाठीची फी;
(v)फ) कलम ५८ च्या पोटकलम (२) च्या खंड (छ) अंतर्गत सिविल न्यायालयाच्या कोणत्याही अन्य शक्ती निर्धारित करणे अपेक्षित आहे.
(w)ब) कलम ५२-क खालील ९.(अपिल न्यायाधिकरणाच्या) अध्यक्षाचे अधिकार व कामे;
(x)भ) खालील ६७-ग अन्वये ठेवावयाची व जतन करावयाची माहिती अशी माहिती ठेवण्याचा कालावधी, ती ठेवण्याची रीत व स्वरूप;
(y)म) कलम ६९ च्या पोटकलम (२) अन्वये माहिती मध्येच अडविण्याची तिचे संनियंत्रण करण्याची किंवा ती क्षीण करण्याची प्रक्रिया व सुरक्षा उपाय.
(z)य) कलम ६९-क च्या पोटकलम (२) अन्वये जनतेस पाहावयास मिळण्यापासून अवरूद्ध करण्याची प्रक्रिया व सुरक्षा उपाय;
(za)यक) कलम ६९-ख च्या पोटकलम (३) अन्वये ट्राफिक डाटा किंवा माहिती संनियंत्रित करण्याची, गोळा करण्याची कार्यपद्धती व सुरक्षा उपाय;
(zb)यख) कलम ७० खालील सुरक्षित यंत्रणेसाठी माहिती सुरक्षा प्रक्रिया व कर्तव्ये;
(zc)यग) कलम ७०-क च्या पोटकलम (३) खालील एजन्सीची कामे व कर्तव्ये पार पाडण्याची रीत;
(zd)यघ) कलम ७०-ख च्या पोटकलम (२) खालील अधिकारी व कर्मचारी;
(ze)यङ) कलम ७०-ख च्या पोटकलम (३) खालील महासंचालकाचे आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आणि त्यांच्या सेवेच्या अन्य अटी व शर्ती;
(zf)यच) कलम ७०-क च्या पोटकलम (५) अन्वये ज्या रीतीने एजन्सीची कामे व कर्तव्ये पार पाडण्यात येतील ती रीत;
(zg)यछ) कलम ७९ च्या पोटकलम (२) खालील मध्यस्थांनी पालन करावयाची मार्गदर्शक तत्त्वे;
(zh)यज) कलम ८४-क खालील रूपांतरित करण्याचे मार्ग व पद्धती.
३) कलम ७०-क च्या पोटकलम (१) अन्वये केंद्र शासनाने काढलेली प्रत्येक अधिसूचना आणि त्याने केलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यावर शक्य तितक्या लवकर संसदेचे अधिवेशन चालू असताना संसदेच्या प्रत्येक सभागृहात, एका किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक अधिवेशनांत मिळून एकूण तीस दिवसांच्या कालावधीसाठी मांडण्यात येईल आणि त्या अधिवेशनाच्या किंवा उपरोक्तप्रमाणे त्या लागोपाठच्या अधिवेशनानंतरच्या अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वी त्या ६.(*) नियमात कोणतेही फेरबदल करण्यासाठी दोन्ही सभागृहे सहमत झाली किंवा ६.(*) तो नियम करण्यात येऊ नयेत यासाठी दोन्ही सभागृहे सहमत झाली तर त्यानंतर ६.(***) ते नियम त्या सुधारित स्वरूपात अमलात येतील किंवा यथास्थिती अमलात येणार नाहीत; मात्र अशा फेरबदलांमुळे किंवा रद्द करण्यामुळे त्या अधिसूचनेद्वारे किंवा नियमाद्वारे पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीस बाध येणार नाही.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४६ द्वारे सुधारणा.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४६ द्वारे दाखल.
३.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ५ द्वारे सुधारणा.
४.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४६ द्वारे सुधारणा.
५.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४६ द्वारे सुधारणा.
६.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४६ द्वारे गाळले.
७.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४६ द्वारे दाखल.
८.सन २०१७ चा अधिनियम ७ च्या कलम १६९ द्वारे खंड द, ध, न गाळले.
९. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.