माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ८४ :
चांगल्या हेतूने केलेल्या कृतीला संरक्षण :
केंद्र सरकार, राज्य सरकार, नियंत्रक किंवा त्याच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती,१.(आणि निर्णय अधिकारी) यांनी या अधिनियमाला किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमाला, विनियमाला किंवा आदेशाला अनुसरून चांगल्या हेतूने केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कार्यवाही करण्यात येणार नाही.
——-
१.सन २०१७ चा अधिनियम ७ च्या कलम १६९ द्वारे सुधारणा.