माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७७क(अ) :
१.(अपराधांचा आपसमेळ :
सक्षम अधिकारिता असलेले न्यायालय, या अधिनियमाखालील ज्या अपराधासाठी आजीवन कारावासाची शिक्षा किंवा तीन वर्षापेक्षा अधिक मुदतीची कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे अशा अपराधांखेरीज अन्य अपराधांची आपसमेळ (अपराध आपआपसांत मिटवणे) करू शकेल.
परंतु, न्यायालय ज्या अपराधासाठी आरोपी त्याच्या पूर्व दोषसिद्धीच्या कारणामुळे एकतर वाढीव शिक्षेस किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षेस पात्र असेल अशा अपराधाचे आपसमेळ करणार नाही.
परंतु आणखी असे की, न्यायालय ज्या अपराधामुळे देशाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर परीणाम झाला असेल किंवा जो अपराध, १८ वर्षे वयाखालील मुलांच्या संबंधात किंवा महिलेच्या संबंधात करण्यात आला असेल अशा अपराधाची आपसमेळ करणार नाही.
२) या अधिनियमाखालील अपराधाचा आरोप असलेली व्यक्ती, ज्या न्यायालयात, न्यायचैकशीसाठी अपराध प्रलंबित असेल त्या न्यायालयात आपसमेळ करण्यासाठी अर्ज दाखल करू शकेल आणि फौजदारी प्रक्रिया, १९७३ च्या कलम २६५ ब व २६५ क च्या तरतुदी लागू असतील.)
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३८ द्वारे कलम ७७ सुधारणा.