IT Act 2000 कलम ७५ : भारताबाहेर केलेल्या अपराधांना किंवा उल्लंघनांना अधिनियम लागू असणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७५ :
भारताबाहेर केलेल्या अपराधांना किंवा उल्लंघनांना अधिनियम लागू असणे :
१) पोटकलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून, या अधिनियमाच्या तरतुदी, भारताबाहेर केलेल्या कोणत्याही अपराधाला किंवा उल्लंघनालाही कोणत्याही व्यक्तीला तिचे नागरिकत्त्व विचारात न घेता लागू असतील.
२) पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी, कोणत्याही व्यक्तीने भारताबाहेर अपराध किंवा उल्लंघन केले असेल व ती कृती किंवा वर्तणूक ही भारतात असलेला संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यांचा अंतर्भाव असणारा अपराध किंवा उल्लंघन करणारी असेल तर तिला हा अधिनियम लागू असेल.

Leave a Reply