माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७२ :
विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग :
या अधिनियमात किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, हा अधिनियम किंवा त्या अन्वये तयार करण्यात आलेले नियम किंवा विनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकारांनुसार कोणतेही इलेक्टड्ढॉनिक अभिलेख (रेकॉर्ड), पुस्तक, नोंदवही, पत्रव्यवहार, माहिती, दस्तऐवज किंवा इतर सामग्रीमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय असे इलेक्टड्ढॉनिक अभिलेख, पुस्तक, नोंदवडी, पत्रव्यवहार, माहिती, दस्तऐवज किंवा इतर माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला दिली तर ती (माहिती देणारी) व्यक्ती १.(पाच लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.)
——–
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (दोन वर्षापर्यंतच्या मुदतीच्या कारावासाच्या किंवा एक लाक रूपयांपर्यंतच्या दंडाच्या किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.