माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७२क(अ) :
१.(कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड केल्याबद्दल २.(शास्ति) :
या अधिनियमामध्ये किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांमध्ये अन्यथा तरतूद केली असेल ते सोडून, मध्यस्थासह जी कोणतीही व्यक्ती, कायदेशीर कराराच्या अटीनुसार सेवा पुरविते वेळी, अन्य कोणत्याही व्यक्तीचे साहित्य (माहिती) उघड केल्याने तिला अन्यत्र हानी किंवा अन्यत्र लाभ होईल या उद्देशाने किंवा अशा प्रकारे अन्यत्र हानी किंवा अन्यत्र लाभ होण्याचा संभव असल्याचे माहीत असताना, संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा कायदेशीर कराराचा भंग करून दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वैयक्तिक माहिती अंतर्भूत असणाऱ्या कोणत्याही साहित्यात प्रवेश करील ती व्यक्ती, ३.(पंचवीस लाख रुपए असू शकेल इतक्या शास्तीस पात्र असेल.))
——–
१. सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३७ द्वारे दाखल.
२. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (शिक्षा) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
३. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा पाच लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा या दोन्ही शिक्षेस पात्र असेल.) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.