माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७क :
१.(इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेले दस्तऐवज इत्यादींची लेखापरीक्षा :
जेव्हा त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये दस्तऐवजांची, अभिलेखांची किंवा माहितीची लेखापरिक्षा करण्याची तरतूद असेल तेव्हा अशी तरतूद, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संस्कारण केलेल्या किंवा परिरक्षित केलेल्या दस्तऐवजांची, अभिलेखांची किंवा माहितीची लेखापरीक्षा करण्यासाठी देखील लागू असेल.)
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ८ द्वारे दाखल.