माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६७ :
अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठविल्याबाबत शिक्षा :
जी कोणी व्यक्ती सर्व संबंध, परिस्थिती विचारात घेता, जो कामुकभावना वाढवील किंवा वैश्विक भावना चाळवील किंवा त्यात अंतर्भूत असलेला किंवा त्यात समाविष्ट असलेला मजकूर वाचण्याचा, पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा संभव असलेल्या व्यक्तींना नीतिभ्रष्ट करण्याचा त्यात प्रभाव असेल तर, असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करील किंवा पाठवील अथवा प्रसिद्ध करण्याची किंवा पाठविण्याची व्यवस्था करील, अशी व्यक्ती पहिल्या अपराधासाठी तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि पाच लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच दहा लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल.