माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६७ग(क) :
मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे :
१) विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीसाठी आणि केंद्र सरकार विहित करील अशा रीतीने व अशा नमुन्यात मध्यस्थ, अशी माहिती जतन करील व धारण करील.
२) जो कोणताही मध्यस्थ उद्देशपूर्वक किंवा जाणिवपूर्वक पोटकलम (१) च्या तरतुदींचे उल्लंघन करील असा मध्यस्थ १.(पंचवीस लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकेल.)
——–
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.