IT Act 2000 कलम ६६ : १.(संगणकाशी संबंधित अपराध :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६६ :
१.(संगणकाशी संबंधित अपराध :
जर कोणत्याही व्यक्तीने कलम ४३ मध्ये निर्दिष्ट केलेले कोणतेही कृत्य, अप्रामाणिकपणे किंवा लबाडीने केले असेल, तर ती व्यक्ती तीन वर्षापर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा पाच लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा या दोन्हींस पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ,-
(a)क)(अ) अप्रामाणिकपणे या संज्ञेस भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २४ मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.
(b)ख)(ब) लबाडीने या संज्ञेस भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २५ मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.)
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३२ द्वारे कलम ६६ व कलम ६७ सुधारणा.

Leave a Reply