माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण ११ :
अपराध :
कलम ६५ :
संगणक साधनमार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे :
जो कोणी, संगणक, संगणक कार्यक्रम, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यासाठी वापरण्यात आलेला संगणक साधनमार्ग कोड ते त्यावेळी अमलात असलेल्या कायद्यानुसार ठेवणे किंवा जतन करणे आवशय्क असताना जाणीवपूर्वक किंवा हेतूपूर्वक लपवील, नष्ट करील किंवा त्यात फेरफार करील किंवा हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक अन्य व्यक्तीला तो लपविण्यास किंवा नष्ट करण्यास किंवा त्यात फेरफार करण्यास लावील, त्याला तीन वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा किंवा दोन लाख रूपयांपर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी,संगणक साधनमार्ग संकेताक्षर म्हणजे, कार्यक्रम, संगणक कमांड, संकल्पचित्र व आराखडश यांची सुत्री करणे आणि संगणक साधनमार्गाचे कार्यक्रम विश्लेषण कोणत्याही स्वरूपात करणे.