माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६४ :
१.(शास्ती व नुकसानभरपाई वसूल करणे) :
या अधिनियमान्वये २.(लादण्यात आलेली शास्ती व देण्याचा आदेश दिलेली नुकसानभरपाई जर देण्यात आली नाही तर ती जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात यावी आणि लायसेन्स किंवा ३.(इलेक्ट्रॉनिक) प्रमाणपत्र यापैकी जे असेल ते शास्ती देण्यात येईपर्यंत रद्द करण्यात यावे.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३१ द्वारे सुधारणा .
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३१ द्वारे सुधारणा .
३.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा .