IT Act 2000 कलम ५ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची (सहीची)) कायद्याने मान्यता :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ५ :
१.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची (सहीची)) कायद्याने मान्यता :
माहिती किंवा इतर कोणतीही बाब सहीने प्राधिकृत करण्यात येईल किंवा कोणत्याही दस्तऐवजावर कोणतीही व्यक्ती सही करील किंवा त्यावर तिची सही असेल अशी कोणत्याही कायद्याची तरतूद असते तेव्हा अशा कोणत्याही कायद्यात काहीही अंतभूत असले तरीही, अशा कोणत्याही माहितीवर किंवा बाबीवर केंद्र शासनाने विहित केले असेल अशा रीतीने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरद्वारे अधिप्रमाणन केले असले तर ते अधिप्रमाणन अशी गरज पूर्ण करते असे मानण्यात येईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, सही केली याच्या व्याकरणिक फेरफारांसह आणि तत्सम अभिव्यक्तीसह कोणत्याही व्यक्तीच्या संबंधातील अर्थ, कोणत्याही दस्तऐवजावर हाताने लिहून सही करणे किंवा कोणतीही खूण करणे असा आहे आणि सही या संज्ञेचा अर्थ तदनुसार लावण्यात येईल.
——-
१. २००९ चा अधिनियम क्रमांक १० याचे कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply