IT Act 2000 कलम ५५ : अपील न्यायाधिकरणाची रचना करणारे आदेश अंतिम असणे आणि त्याच्या कार्यपद्धतीला बेकायदेशीर ठरविणारे नसणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ५५ :
अपील न्यायाधिकरणाची रचना करणारे आदेश अंतिम असणे आणि त्याच्या कार्यपद्धतीला बेकायदेशीर ठरविणारे नसणे :
सायबर अपील न्यायादिकरणाच्या रचनेत कोणताही दोष आहे याच केवळ कारणावरून कोणत्याही व्यक्तीची १(अपील न्यायाधिकरणाची) २.(अध्यक्ष किंवा सदस्य) म्हणून नेमणूक करणाऱ्या कोणत्याही आदेशाला कोणत्याही रीतीने आक्षेप घेण्यात येणार नाही आणि सायबर अपील न्यायाधिकरणाची कोणतीही कृती किंवा त्याच्यापुढील कोणतीही कार्यवाही यालाही कोणत्याही रीतीने आक्षेप घेण्यात येणार नाही.
——-
१. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे सुधारणा.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २९ द्वारे सुधारणा .

Leave a Reply