माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण १० :
१.(अपील न्यायाधिकरण) :
कलम ४८ :
१.(अपील न्यायाधिकरण) :
२.(भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम, १९९७ (२४ चा १९९७) च्या कलम १४ अंतर्गत स्थापित दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण, वित्त अधिनियम, २०१७ (२०१७ चा ७) च्या अध्याय (प्रकरण) ६ च्या भाग १ च्या प्रारंभापासून, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी अपील न्यायाधिकरण असेल आणि उक्त अपील न्यायाधिकरण या अधिनियमाद्वारे किंवा त्याअंतर्गत प्रदान केलेली अधिकारिता, अधिकार आणि प्राधिकार वापरेल.)
२) अपील न्यायाधिकरणांना कोणत्या विषयांच्या बाबतीत आणि कोणत्या ठिकाणी अधिकारितेचा वापर करता येईल ते सुद्धा ३.(विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये) केंद्र शासन विनिर्दिष्ट करील.)
——-
१. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे मूळ शीर्षकाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे पोटकलम (१) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.