माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण ९ :
१.(शास्ती, नुकसानभरपाई आणि अभिनिर्णय) :
कलम ४३:
संगणक, संगणक यंत्रणा इ. ला नुकसान पोहोचवल्याबद्दल २.(शास्ती व नुकसानभरपाई) :
संगणक, संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा त्याची प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती-
(a)क)(अ) असा संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्कमध्ये ३.(किंवा संगणक नेटवर्कमध्ये (किंवा संगणक साधनसंपत्तीमध्ये) प्रवेश करील किंवा प्रवेश मिळवील;
(b)ख)(ब) असा संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क मधून कोणतीही आधरसामग्री, संगणक आधारसामग्री बेस किंवा माहिती उतरवून घेईल, कॉपी करील किंवा त्याचा गोषवारा घेईल, तसेच काढून घेण्याजोग्या साठवण माध्यमात (स्टोरेज मीडियम) माहिती किंवा आधारसामग्री धारण करील किंवा साठवून ठेवील.
(c)ग)(क) कोणताही संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यामध्ये कोणताही संगणक दुषितक किंवा संगणक व्हायरस घुसवील किंवा घुसविण्याची व्यवस्था करील;
(d)घ)(ड)कोणताही संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क किंवा अशा संगणकातील, संगणक यंत्रणेतील किंवा संगणक नेटवर्कमधील आधारसामग्री, संगणक आधारसामग्री आधार किंवा इतर कोणताही कार्यक्रम याला नुकसान पोहोचवील किंवा नुकसान पोहोचवण्याची व्यवस्था करील;
(e)ङ)(इ) कोणताही संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यांचा भंग करील किंवा भंग करण्याची व्यवस्ता करील;
(f)च)(फ) संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गाने प्रवेश नाकारील किंवा नाकारण्याची व्यवस्था करील;
(g)छ)(ग) कोणत्याही व्यक्तीला संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यामध्ये या अधिनियमाच्या आणि त्याखाली तयार करण्यात आलेले विनियम व नियम यांच्या तरतुदींचे उल्लंघन करून प्रवेश करण्यास सहाय्य करील किंवा ते सुकर करील;
(h)ज)(ह) एखाद्या व्यक्तीने उपलब्ध करून घेतलेल्या सेवांचा आकार एखाद्या संगणकामध्ये, संगणक यंत्रणेमध्ये किंवा संगणक नेटवर्कमध्ये अदलाबदल करून किंवा लबाडीने फेरफार करून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर आकारील.
(i)४.(झ)(आय) संगणक साधनसंपत्तीमध्ये असलेली कोणतीही माहिती नष्ट करील, वगळील किंवा तिच्यात फेरफार करील अथवा तिचे मूल्या किंवा उपयोजिता कमी करील अथवा कोणत्याही साधनांद्वारे तिला क्षतिकारकरीतीने बाधा करील.
(j)ञ)(जे) नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने संगणक साधनसंपत्तीसाठी वापरलेला कोणताही संगणक स्त्रोत संकेतांक चोरील, लपवील, नष्ट करील किंवा त्यात फेरफार करील अथवा तो चोरण्यासाठी, लपवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किवा त्यात
फेरफार करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भाग पाडील;)
५.(ती, व्यक्ती अशाप्रकारे बाधित झालेल्या व्यक्तीला नुकसानभरपाईच्या रूपात नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल.)
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी,-
एक) संगणक दूषितक म्हणजे,-
(a)क)(अ) संगणक, संगणक यंत्रणा, संगणक नेटवर्क यामध्ये असलेली आधारसामग्री किंवा कार्यक्रम यात फेरबदल करण्यासाठी, तो नष्ट करण्यासाठी, रेकॉर्ड करण्यासाठी किंवा पारेषित करण्यासाठी;
(b)ख)(ब) संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क याचे सर्वसाधारण प्रवर्तन कोणत्याही मार्गाने बळकावण्यासाठी, तयार केलेला कोणताही संगणक निदेश संच;
दोन) संगणक आधारसामग्री म्हणजे, औपचारिक रीतीने तयार करण्यात येत असलेल्या किंवा करण्यात आलेल्या किंवा संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्कद्वारे उत्पादन करण्यात आलेल्या टेक्स्ट, इमेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ मधील माहिती, ज्ञान, तथ्ये, संकल्पना किंवा निदेश यांचे प्रतीक, आणि संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक-नेटवर्क यामध्ये त्याचा वापर करण्यासाठी उद्देशित असते;
तीन) कॉम्प्युटर विषाणू (व्हायरस) म्हणजे, संगणक साधनमार्गाच्या कार्यचालनाचा नाश करणारा, त्याला नुकसान पोहोचवणारा, त्याचा दर्जा कमी करणारा किंवा त्यावर प्रतिकूल परिणाम करणारा किंवा स्वत:च दुसऱ्या संगणक साधनाचा किंवा ऑपरेटरचा कार्यक्रम, आधारसामग्री किंवा निदेशन यांची अंमलबजावणी केली जात असताना त्यावर किंवा संगणक साधनसामग्रीच्या इतर कोणत्याही प्रसंगी त्यावर हल्ला करणारा कोणताही संगणक निदेश, माहिती आधारसामग्री किंवा कार्यक्रम;
चार) हानी म्हणजे कोणताही संगणक साधनमार्ग कोणत्याही साधनाद्वो नष्ट करणे, त्यात फेरबदल करणे, तो वगळणे, त्यात भर घालणे, फेरबदल करणे किंवा त्याची पुन्हा रचना करणे.
४.(पाच) संगणक स्त्रोत संकेतांक याचा अर्थ, कार्यकमांची सूची, संगणक आज्ञावली, संकल्पचित्र व आराखडा आणि कोणत्याही स्वरूपातील संगणक साधनसंपत्तीचे कार्यक्रमविषयक विश्लेषण, असा आहे.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २० द्वारे सुधारणा .
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २१ द्वारे सुधारणा .
३.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २१ द्वारे दाखल केले.
४.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २१ द्वारे दाखल केले.
५.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २१ द्वारे सुधारणा .