IT Act 2000 कलम ४१ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ४१ :
डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे :
१) वर्गणीदार जर डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र प्रसिद्ध करील किंवा त्यासाठी
(a)क)अ) एका किंवा अधिक व्यक्तींना प्राधिकृत करील,
(b)ख)ब) रिपॉझिटरीमध्ये प्रसिद्ध करील, किंवा अन्य कोणत्याही प्रकारे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रास आपली मान्यता देईल तर,
त्याने डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचा स्वीकार केला असल्याचे मानण्यात येईल.
२) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचा स्वीकार करून त्या डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या माहितीवर वाजवीरीत्या विसंबून राहाणाऱ्याला.
(a)क)अ) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या पब्लिक की शी अनुरूप अशी खासगी की त्या वर्गणीदाराकडे आहे आणि तो ती धारण करण्यास हक्कदार आहे.
(b)ख)ब) वर्गणीदाराने प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाला केलेली सर्व अभिवेदने आणि डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या माहितीशी संबद्ध असलेल्या सर्व विषयवस्तू खऱ्या आहेत;
(c)ग) क) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रातील सर्व माहिती खरी आहे म्हणजेच वर्गणीदाराच्या माहितीनुसार खरी आहे.

Leave a Reply