माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण २ :
१.(डिजिटल सिग्नेचर व इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) :
कलम ३:
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन :
१) या कलमाच्या तरतुदीस अधीन राहून कोणताही वर्गणीदार आपली डिजिटल सही जोडून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अधिप्रमाणित करू शकेल.
२) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन अॅसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम आणि हॅश फंक्शनद्वारे करण्यात येईल, जे प्रारंभिक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आच्छादित करील आणि त्याचे दुसऱ्या इलेक्ट्रानिक रेकॉर्डमध्ये हस्तांतरण करतील.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी, हॅश फक्शन म्हणजे अॅल्गोरिथम मॅपिंग किंवा बाईट्सच्या एका सिक्वेन्सचे दुसऱ्या सिक्वेन्समध्ये रूपांतर, सर्वसाधारणपणे हॅश रिझल्ट म्हणून ओळखला जाणारा इलेक्ट्रॉनिक रेकार्डसारखा लहान सेट प्रत्येक वेळी अल्गोरिथम त्याच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्याबरोबर कार्यान्वित करणत्यात येते तेव्हा तोच हॅश रिझल्ट देतो कारण त्यांच्या सनपुटमुळे ते गणना करण्याच्या दृष्टीने-
(a)अ) अल्गोरिथमद्वारे उत्पन्न करण्यात आलेल्या हॅश रिझल्टमधून मूळ इलेक्ट्रानिक रेकार्ड काढण्यास किंवा पुन्हा तयार करण्यासाठी अव्यवहार्य आहे;
(b)ब) दोन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डस् अल्गोरिथम वापरून एकच हॅश रिझल्ट निर्माण करू शकतात हे अव्यवहार्य आहे.
३) कोणतीही व्यक्ती, वर्गणीदाराच्या पब्लिक कीचा वापर करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची पडताळणी करू शकते.
४) प्रायव्हेट की आणि पब्लिक की या वर्गणीदारासाठी वैशिष्ट्यपूर्ण की असून त्यांची मिळून कार्यात्मक की पेअर (जोडी) तयार होते.
———
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ५ द्वारे सुधारणा.