माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३८ :
डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करणे :
१) प्रमाणन प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र त्याला पुढील बाबतीत रद्द करता येईल.
(a)क)(अ) वर्गणीदाराने किंवा त्याने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीने तशा अशयाची विनंती केली असेल; किंवा
(b)ख)(ब) वर्गणीदाराचा मृत्यू झाला असेल; किंवा
(c)ग) (क)वर्गणीदार ही भागीदारी संस्था किंवा कंपनी असेल अशा बाबतीत, भागीदारी संस्थेचे विघटन झाले असेल किंवा कंपनीचे परिसमापन झाले असेल.
२) पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून आणि पोटकलम (१) च्या तरतुदीस बाध न येता प्रमाणन प्राधिकरणाला त्याने दिलेले डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र कोणत्याही वेळी-
(a)क)(अ) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रात दर्शविलेल्या महत्त्वाच्या गोष्टी एकतर खोट्या आहेत किंवा त्या लपविण्यात आल्या आहेत;
(b)ख)(ब) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत;
(c)ग) (क)प्रमाणन प्राधिकरणाची प्रायव्हेट की, किंवा सुरक्षा यंत्रणा यांच्याबाबतीत अशाप्रकारे तडजोड करण्यात आली आहे की त्यामुळे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राच्या विश्वासार्हतेवर महत्त्वपूर्ण असा परिणाम होण्याची शक्यता आहे;
(d)घ) (ड)वर्गणीदाराला नादार किंवा मृत म्हणून घोषित करण्यात आले आहे किंवा वर्गणीदार ही भागीदारी संस्था किंवा कंपनी असेल अशा बाबतीत, ती विघटित झाली आहे किंवा परिसमापित झाली आहे किंवा अन्यथा अस्तित्वात असणे बंद झाले आहे. असे प्राधिकरणाचे मत असेल तर त्याला ते रद्द करता येईल.
३) वर्गणीदाराला त्या बाबतीत आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याखेरीज डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार नाही.
४) या कलमान्वये डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यावर वर्गणीदाराला तसे कळविण्यात येईल.