माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३७ :
डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचे निलंबन :
१) ज्या प्रमाणन प्राधिकरणाने डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिले आहे ते, पोटकलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून-
(a)क) (अ)(एक) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या वर्गणीदाराने, किंवा-
दोन) त्या वर्गणीदाराच्या वतीने कृती करण्यासाठी रीतसर प्राधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने केलेली तशा आशयाची विनंती मिळाल्यावरून,
(b)ख)(ब) लोकहिताच्या दृष्टीने डिजिटल सिग्नेचर निलंबित करणे आवश्यक आहे, तर ते असे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र निलंबित करील.
२) वर्गणीदाराला त्या बाबतीत बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याखेरीज एखादे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबित करण्यात येणार नाही.
३) या कलमान्वये डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र निलंबित करण्यात आल्यानंतर प्रमाणन प्राधिकरण ती गोष्ट वर्गणीदाराला कळवील.