माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३६ :
डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिल्यानंतरचे अभिवेदन :
प्रमाणन-प्राधिकरण, डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र देताना असे प्रमाणित करील की,-
(a)क)(अ) त्याने हा अधिनियम आणि त्याखाली करण्यात आलेले नियम व विनियम यांच्या तरतुदीचे पालन केले आहे;
(b)ख)(ब) त्याने डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिले आहे किंवा त्याच्यावर विसंबून असणाऱ्या अशा व्यक्तीला ते उपलब्ध करून दिले आहे आणि वर्गणीदाराने ते स्वीकारले आहे;
(c)ग)(क) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या की शी अनुरूप अशी प्रायव्हेट की वर्गणीदाराकडे आहे;
(ca)१.(गक) (कअ) डिजिटल सिग्नेचर तयार करण्यास सक्षम असणारी प्रायव्हेट की कारण केली आहे.
(cb)गख)(कब) प्रमाणपत्रामध्ये सुचीबद्ध करावयाची पब्लिक की, वर्गणीदाराने धारण केलेल्या प्रायव्हेट की द्वारे लावलेल्या डिजिटल सिग्नेचरची पडताळणी करण्यासाठी वापरता येऊ शकेल;)
(d)घ)(इ)वर्गणीदाराची पब्लिक की आणि प्रायव्हेट की मिळून कार्यशील की – जोडी तयार होते;
(e)ङ)(फ) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रात अंतर्भूत असलेली माहिती अचूक आहे; आणि
(f)च)(ग) जी वस्तुस्थिती डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रात समाविष्ट करण्यात आली तर तिचा खंड (क) ते (घ) मध्ये केलेल्या अभिवेदनावर प्रतिकूल परिणाम होईल अशी कोणतीही महत्त्वपूर्ण वस्तुस्थिती त्याला माहीत नाही.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १८ द्वारे दाखल केले.