माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २४ :
लायसेन्स देण्याची किंवा नाकारण्याची कार्यपद्धती :
कलम २१ च्या पोटकलम (१) अन्वये अर्ज मिळाल्यानंतर नियंत्रक, अर्जासोबतचे दस्तऐवज आणि त्याला योग्य वाटतील असे इतर घटक (विचारात घेतल्यानंतर) लायसेन्स देईल किंवा तो अर्ज फेटाळून लावील.
परंत, या कलमाखालील कोणताही अर्ज, अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय नाकारण्यात येणार नाही.