Ipc कलम ९७ : शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ९७ :
शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क:
(See section 35 of BNS 2023)
कलम ९९ मध्ये अंतर्भूत असलेल्या निर्बंधांच्या अधीनतेने, प्रत्येक व्यक्तीला-
एक- मानवी शरीराला बाधक होणाऱ्या कोणत्याही अपराधापासून, तिचे स्वत:चे शरीर आणि अन्य कोणत्याही व्यक्तीचे शरीर;
दोन -चोरी, जबरी चोरी, आगळीक (अपक्रिया) किंवा, फौजदारी पात्र अतिक्रमण यांच्या व्याख्येत येणारा अपराध अथवा चोरी, जबरी चोरी, आगळीक किंवा फौजदारीपात्र अतिक्रमण करण्याचा प्रयत्न या स्वरुपातील कोणत्याही कृतीपासून स्वत:ची किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीची जंगम किंवा स्थावर मालमत्ता, यांचा बचाव करण्याचा हक्क आहे.

Leave a Reply