Ipc कलम ७५ : १.(प्रकरण १२ किंवा १७ याखाली पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ७५ :
१.(प्रकरण १२ किंवा १७ याखाली पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :
(See section 13 of BNS 2023)
जो कोणी-
(क) या संहितेमधील प्रकरण १२ किंवा १७ याखालील तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल २.(भारतामधील) एखाद्या न्यायालयाने,
(ख) ३.(***)
त्यास दोषी ठरविल्यानंतर त्या दोहोंपैकी कोणत्याही प्रकरणाखाली तितक्याच मुदतीच्या, त्याच प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला कोणताही अपराध नंतर केल्यामुळे दोषी होईल, तो अशा नंतरच्या प्रत्येक अपराधाबद्दल ४.(आजन्म कारावास) किंवा दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासास पात्र ठरेल.)
——–
१. १९१० चा अधिनियम ३ – कलम २ द्वारे मूळ कलमाऐवजी हे कलम समाविष्ट करण्यात आले.
२. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी वरील मजकूर दाखल करण्यात आला.
३. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ द्वारे खंड (क) च्या शेवटी असलेला किंवा हा शब्द व खंड (ख) वगळण्यात आला.
४. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी हा मजकूर समाविष्ट करण्यात आला. (१-१-१९५६ रोजी व तेव्हापासून)

Leave a Reply