Ipc कलम ६३ : द्रव्यदंडाची रक्कम :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ६३ :
द्रव्यदंडाची रक्कम :
(See section 8 of BNS 2023)
द्रव्यदंड किती रकमेपर्यंत असावा ती मर्यादा व्यक्त केली नसेल तेथे, अपराधी ज्यास पात्र होतो द्रव्यदंडाच्या रकमेवर मर्यादा असणार नाही, परंतु ती रक्कम बेसुमार असणार नाही.

कलम ६४ :
द्रव्यदंड न भरण्याबद्दल कारावासाची शिक्षा :
(See section 8 of BNS 2023)
१.(कारावास व त्याचप्रमाणे द्रव्यदंड या शिक्षांस पात्र असलेल्या अपराधाबद्दल अपराध्याला ज्यामध्ये द्रव्यदंडाची – मग तो कारावासासहित असो वा त्याविना असो – शिक्षा झाली असेल अशा प्रत्येक प्रकरणी,
आणि २.(कारावास किंवा द्रव्यदंड किंवा) फक्त द्रव्यदंड या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल अपराध्याला ज्यामध्ये द्रव्यदंडाची शिक्षा झाली असेल, अशा प्रत्येक प्रकरणी,)
अशा अपराध्यास शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने शिक्षादेशात असे निदेशित करणे विधिमान्य असेल की, द्रव्यदंडाचा भरणा करण्यास कसूर झाल्यास, अपराध्याला कारागृहात टाकण्यात यावे आणि हा कारावास, त्याला जी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे अथवा शिक्षा – परिवर्तनामुळे तो ज्याला पात्र होऊ शकेल अशा इतर कोणत्याही कारावासापेक्षा अधिक असेल.
———
१. १८८२ चा अधिनियम ८ – कलम २ द्वारे अपराध्याला द्रव्यदंडाची शिक्षा झाली असेल अशा प्रत्येक प्रकरणी याऐवजी हे दाखल करण्यात आले.
२. १८८६ चा अधिनियम १० – कलम २१ (२) द्वारे समाविष्ट करण्यात आले.

कलम ६५ :
कारावास आणि द्रव्यदंड ही शिक्षा देता येण्यासारखी असेल, तर द्रव्यदंड न भरल्यास कारावासाची मर्यादा :
(See section 8(3) of BNS 2023)
अपराध हा कारावासाचा व त्याचप्रमाणे द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल तर, न्यायालय द्रव्यदंडाचा भरणा करण्यात कसूर केल्याबद्दल अपराध्याला जितक्या मुदतीसाठी कारागृहात टाकण्याचा निदेश देईल ती मुदत अपराधासाठी निश्चित केलेल्या कमाल मुदतीच्या कारावासाच्या एक-चतुर्थांशापेक्षा अधिक असणार नाही.

कलम ६६ :
द्रव्यदंड न भरल्यास कोणत्या वर्णनाची कारावासाची शिक्षा :
(See section 8(4),(5) of BNS 2023)
द्रव्यदंड भरणा करण्यास कसूर केल्यास न्यायालय जो कारावास देईल तो कारावास अपराध्याला अपराधाबद्दल ज्या प्रकारचा कारावास दिला जाऊ शकला असता अशा कोणत्याही वर्णनाचा असू शकेल.

कलम ६७ :
अपराध फक्त द्रव्यदंडास पात्र असेल तेव्हा, द्रव्यदंड न भरण्याबद्दल कारावास :
(See section 8(5) of BNS 2023)
अपराध फक्त द्रव्यदंडासच पात्र असेल तर, १.(न्यायालय द्रव्यदंडाचा भरणा करण्यात कसूर केल्याबद्दल जो कारावास देईल तो साधा असेल, आणि) न्यायालय द्रव्यदंडाचा भरणा करण्यात कसूर झाल्यास अपराध्याला जितक्या मुदतीसाठी कारागृहात ठेवण्याचा निदेश देईल ती मुदत पुढील प्रमाणापेक्षा अधिक असणार नाही, म्हणजेच –
द्रव्यदंडाची रक्कम पन्नास रुपयांपेक्षा अधिक नसेल तेव्हा तो कारावास जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत कितीही मुदतीचा असेल आणि
रक्कम शंभर रुपयांपेक्षा अधिक नसेल तेव्हा तो कारावास जास्तीत जास्त चार महिन्यांपर्यंत कितीही मुदतीचा असेल आणि
इतर कोणत्याही प्रकरणी, जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत कितीही मुदतीचा असेल.
———
१. १८८२ चा अधिनियम ८ – कलम ३ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

कलम ६८ :
द्रव्यदंडाचा भरणा होताच कारावास समाप्त होणे :
(See section 8(6) of BNS 2023)
द्रव्यदंडाचा भरणा करण्यातील कसुरीबद्दल देण्यात आलेला कारावास हा जेव्हा केव्हा द्रव्यदंड भरण्यात येईल किंवा धिप्रक्रियेनुसार वसूल केला जाईल तेव्हा समाप्त होईल.

कलम ६९ :
द्रव्यदंडाचा प्रमाणशीर हिस्सा भरल्यानंतर कारावासाची समाप्ती :
(See section 8(6) of BNS 2023)
द्रव्यदंडाचा भरणा करण्यातील कसुरीबद्दल ठोठावण्यात आलेल्या कारावासाची मुदत संपण्यापूर्वी जर द्रव्यदंडाचा काही भाग भरण्यात आला अगर वसूल करण्यात आला व भरणा करण्यातील कसुरीबद्दलच्या कारावासापैकी जितक्या मुदतीचा कारावास भोगण्यात आला तितकी मुदत ही द्रव्यदंडापैकी न भरलेल्या भागाशी प्रमाणशीर असलेल्या मर्यादेपेक्षा कमी नसेल तर, कारावास समाप्त होईल.
उदाहरण :
(क) याला शंभर रुपये द्रव्यदंड व तो न भरल्यास चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी, कारावासाचचा एक महिना संपण्यापूर्वी जर पंचाहत्तर रुपये द्रव्यदंड भरण्यात किंवा वसूल करण्यात आला तर, पहिला महिना संपला की लेगच (क) ला मुक्त करण्यात येईल. जर पहिला महिना संपण्याच्या वेळी किंवा (क) कारावासात असेपर्यंतच्या काळात नंतर कोणत्याहीवेळी पंचाहत्तर रुपये भरण्यात किंवा वसूल करण्यात आले तर, (क) ला तत्काळ मुक्त करण्यात येईल. कारावासाचे दोन महिने संपण्यापूर्वी द्रव्यदंडापैकी पन्नास रुपये भरण्यात किंवा वसूल करण्यात आले तर, दोन महिने पूर्ण झाले की लगेच (क) ला मुक्त करण्यात येईल. जर दोन महिने संपण्याच्या वेळी किंवा (क) कारावासात असेपर्यंतच्या काळात नंतर कोणत्याही वेळी पन्नासस रुपये भरण्यात किंवा वसूल करण्यात आले तर, (क) ला तत्काळ मुक्त करण्यात येईल.

कलम ७० :
सहा वर्षाच्या आत किंवा कारागृहात असताना द्रव्यदंड वसुलीयोग्य.मृत्यूमुळे मालमत्ता दायित्वातून मुक्त होत नाही :
(See section 8(7) of BNS 2023)
भरणा व्हावयाचा राहिलेला द्रव्यदंड किंवा त्याचा कोणताही भाग हा, शिक्षादेश देण्यात आल्यापासून सहा वर्षाच्या आत कोणत्याही वेळी किंवा शिक्षादेशानुसार अपराधी सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारावासास पात्र असेल तर तो कालावधी समाप्त होण्यापूर्वी कोणत्याही वेळी दंड वसूल करता येईल; आणि अशा अपराध्याच्या मृत्यूनंतरदेखील जी कोणती मालमत्ता त्याच्या शऋृणांबद्दल विधित: (कायद्याने) दायी होऊ शकेल ती त्याच्या मृत्यूमुळे या दायित्वातून मुक्त होत नाही.

Leave a Reply