भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५१० :
नशापाणी केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले गैरवर्तन :
(See section 355 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नशेच्या अवस्थेत सार्वजनिक स्थळी, इत्यादी येऊन कोणत्याही व्यक्तीला त्रास देणे.
शिक्षा :२४ तासांचा साधा कारावास, किंवा १० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी नशेच्या अवस्थेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, किंवा त्याने जेथे प्रवेश करणे हे अतिक्रमण आहे अशा कोणत्याही ठिकाणी वावरेल आणि कोणत्याही व्यक्तीस त्रास होईल अशा तऱ्हेने तेथे वर्तन करील त्याला चोवीस तासांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची किंवा दहा रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.