Ipc कलम ५०६ : फौजदारीपात्र (आपराधिक ) धाकदपटशाबद्धल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५०६ :
फौजदारीपात्र (आपराधिक ) धाकदपटशाबद्धल शिक्षा :
(See section 351(2) and (3) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फौजदारीपात्र धाकदपटशा
शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : धाकदपटशा दाखवलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
अपराध : मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणणे इत्यादीची धमकी असल्यास.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : धाकदपटशा दाखवलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
जो कोणी फौजदारीपात्र धाकदपटशाचा अपराध करील त्याला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी असल्यास :
आणि जर मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची, अथवा आग लावून कोणतीही मालमत्ता नष्ट करण्याची, अथवा मृत्यूच्या किंवा १.(आजन्म कारावासाच्या), किंवा सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध घडवण्याची, अथवा कोणत्याही स्त्रीवर व्यभिचारीपणाचा अभ्यारोप करण्याची धमकी असेल, तर त्याला सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
———
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply