Ipc कलम ५०२ : अब्रुनुकसानीकारक साहित्य अंतर्भूत असलेला छापील किंवा कोरीव पदार्थ विकणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५०२ :
अब्रुनुकसानीकारक साहित्य अंतर्भूत असलेला छापील किंवा कोरीव पदार्थ विकणे:
(See section 356(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अ) राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा मंत्री आपली सरकारी कार्ये पार पाडत असतानाच्या त्याच्या वर्तनाबाबत त्याची अबु्रनुकसानी करणारे साहीत्य एखाद्या छापील किंवा कारीव पदार्थावर असल्याचे माहीत असताना अशा पदार्थाची विक्री – सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता.
शिक्षा :२ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
अपराध : ब) अन्य कोणत्याही प्रकरणी, एखाद्या छापील किंवा कोरीव पदार्थावर अब्रुनुकसानकारक साहित्य असल्याचे माहीत असताना अशा पदार्थाची विक्री.
शिक्षा :२ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अब्रुनुकसानीकारक साहित्य अंतर्भूत असलेला कोणताही छापील किंवा कोरीव पदार्थ, त्यात असे साहित्य आहे हे माहीत असून, जो कोणी तो विकेल, किंवा विकत देऊ करील त्याला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची, किवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply