भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५०१ :
अब्रुनकसानीकारक असल्याचे माहीत असलेले साहित्य छापणे किंवा कोरणे :
(See section 356(3) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अ) एखादे साहित्य राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा मंत्री आपली सरकारी कार्ये पार पाडत असतानाच्या त्याच्या वर्तनाबाबत त्याची अबु्रनुकसानी करणारा असल्याचे माहीत असताना तो छापणे किंवा कोरणे – सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता.
शिक्षा :२ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
अपराध : ब) अन्य कोणत्याही प्रकरणी एखादे साहित्य अब्रुनुकसानीकारक असल्याचे माहीत असताना ते छापणे किंवा कोरणे.
शिक्षा :२ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी एखादे साहित्य कोणत्याही व्यक्तीला अब्रूनुसानीकारक आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास सबळ कारण असताना असे साहित्य छापील किंवा कोरील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.