Ipc कलम ४९७ : परगमन (जारकर्म) :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४९७ :
१. (परगमन (जारकर्म) :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : परगमन.
शिक्षा :५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : त्या स्त्रीचा पती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जी व्यक्ती अन्य पुरुषाची पत्नी असून ते स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल, अशा व्यक्तीशी त्या पुरुषाची संमती किंवा मुकानूमती नसताना जो कोणी लैंगिक संभोग करील व हा लैंगिक संभोग बलात्काराचा अपराध या सदरात मोडत नसेल, तर तो परगमनाच्या अपराधाबद्दल दोषी असेल आणि त्याला पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील, अशा प्रकरणी, पत्नी ही अपप्रेरक म्हणून शिक्षापात्र होणार नाही.)
——–
१. (डब्ल्यू पी (सीआरएल) १९४/२०१७ जोसेप शाइन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. सर्वोच्च न्यायालयाने कलम ४९७ रद्द केले.

Leave a Reply